“मुलांना रोज Bakery पदार्थ देताय?”
त्याचा परिणाम फक्त वजनावर नाही… पचन आणि मेंदूवरही होऊ शकतो!
मुलांना सतत bakery पदार्थ (cake, pastry, cream biscuits, puffs, white bread, donuts, packaged baked snacks) देण्याबाबत आधुनिक संशोधन आणि आयुर्वेद दोन्ही सावध राहायला सांगतात. कधीतरी खाणे वेगळे, पण रोज किंवा वारंवार खाल्ल्यास पचन, वर्तन, वजन आणि आरोग्यावर परिणाम दिसू शकतात.

Table of Contents
आधुनिक संशोधन काय सांगते?
बहुतेक bakery पदार्थांमध्ये हे जास्त प्रमाणात असते:
- Refined maida
- Excess sugar
- Trans fats / refined oils
- Artificial colors & preservatives
- Low fiber
यामुळे मुलांमध्ये खालील परिणाम दिसू शकतात:
1)पचनावर परिणाम
- पोट फुगणे
- Constipation
- Acidity
- भूक कमी होणे किवा सतत खा-खा होणे
- Gut microbiome imbalance
Gut microbiome म्हणजे आतड्यातील चांगले bacteria. Ultra-processed foods मुळे त्यांचे संतुलन बिघडू शकते असे अनेक अभ्यास सुचवतात.
2) Immunity कमी होणे
सतत processed food खाणाऱ्या मुलांमध्ये वारंवार सर्दी, cough, fatigue दिसू शकते.
3) Hyperactivity आणि concentration issues
काही संशोधनात excessive sugar आणि artificial additives चा संबंध:
- Irritability
- Attention issues
- Mood swings
यांच्याशी जोडला गेला आहे.
4)Obesity आणि metabolic problems
लहान वयातच:
- Obesity
- Fatty liver
- Insulin resistance.
यांचा धोका वाढू शकतो.
5) Addiction-like eating pattern
Sugar + fat combination मेंदूच्या reward pathway ला stimulate करते. त्यामुळे मुलांना घरचे साधे अन्न कमी आवडू लागते..

आयुर्वेद काय सांगतो?
आयुर्वेदात “अतिगुरु, अभिष्यंदी, विरुद्ध आणि कृत्रिम आहार” वारंवार घेतल्यास अग्नी मंद होतो असे सांगितले आहे.
आयुर्वेद फक्त रोग बघत नाही…
तर त्या मुलाची प्रकृती, पचनशक्ती आणि वाढही पाहतो. आयुर्वेदानुसार प्रत्येक मुलाची प्रकृती वेगळी असते — वात, पित्त, कफ.”
एखादं मूल सतत active……. एखादं पटकन चिडणारं……. तर एखादं शांत पण वारंवार सर्दी होणारं.
आयुर्वेदानुसार लहान मुलांच्या शरीरात कफ दोष नैसर्गिकरित्या जास्त प्रमाणात असतो.
कारण बाल्यावस्था ही “कफप्रधान अवस्था” मानली जाते. कफामुळेच मुलांची वाढ, ताकद, ओलावा, झोप आणि शरीराची बांधणी चांगली राहते.
पण कफ वाढला की काही तक्रारी दिसू शकतात:
- वारंवार सर्दी-खोकला
- नाक बंद होणे
- घशात कफ साचणे
- भूक कमी लागणे
- जडपणा व आळस
- पचन मंद होणे
- टॉन्सिल किंवा अॅलर्जीची प्रवृत्ती
कफ वाढण्याची कारणे
- जास्त गोड, थंड, मैद्याचे व बेकरी पदार्थ
- आईस्क्रीम, कोल्ड ड्रिंक्स
- दिवसा जास्त झोप
- कमी हालचाल
- अति दही किंवा चीज
आयुर्वेदात बालकांच्या प्रकृतीनुसार उपचार, आहार आणि दिनचर्या दिली जाते, त्यामुळे प्रत्येक मुलासाठी मार्गदर्शन वेगळे असू शकते.
ब्रेड सतत 15 दिवस खाल्ला कि बी 12 आणि इतर पाण्यात विरघळणारी vitamins झपझप कमी होत जातात ;बाहेरील तळलेले पदार्थ ( जळक्या तेलातील ) , फोडण्या दिलेले खाल्ले कि उरलेल्यांची वाट लागते.
Bakery पदार्थ बहुतेक:
- गुरु (जड)
- स्निग्ध पण अपथ्य
- अभिष्यंदी (सूक्ष्म स्रोतस बंद करणारे)
- आम निर्माण करणारे
त्यामुळे काय होऊ शकते?
- मंदाग्नी
- आम निर्मिती
- कफ वाढ
- वारंवार सर्दी
- त्वचेचे त्रास
- आळस
- पचन बिघाड
- एकाग्रता कमी
- वजन वाढणे (Obesity)
- हृदयाचे आजार (Heart attack)
- गतीमंदत्व किवा मतिमंदत्व
मुलांमध्ये “आम” कसा दिसू शकतो?
- जीभेवर पांढरा थर
- भूक न लागणे
- वारंवार आजार
- चिकट शौच
- झोपेत अस्वस्थता
- चिडचिड
लहानपणा पासून vitamins कमतरतेची लक्षणे हि समजून सुद्धा येत नाहीत ते सर्व नॉर्मलच आहे असे सर्वाना वाटते ,
एखाद्याला गणित विषय पटकन समजतो आणि दुसरा गणितात विचारच करू शकत नाही डोके दुखते ,कन्फ्युज व्हायला होते थकवा येतो ,रडायला येते याचा धब्बा त्याचे गणित कच्चे आहे असा आयुष्यभर राहतो. याची जबाबदारी वैदय घेतो आणि त्याची प्रकृती काल आणि दोष यांचे निरीक्षण करून चिकित्सा केल्यास फायदा दिसून येतो.
एक धक्कादायक सत्य :-
मुंबई मध्ये बेकरी अभ्यासक संशोधकानी बेकरी मध्ये वापरल्या जाणाऱ्या टाकाऊ लाकडाच्या ज्वलनातून निघणाऱ्या धुरामुळे कर्करोगा सारखा आजार होतो असा निष्कर्ष काढला आहे
बहुतांश बेकरी या पदार्थ भाजण्यासाठी भट्टीत खराब झालेली लाकडे वापरतात. या लकडतून बाहेर पडणारी हानिकारक बाष्पशील सेंद्रिय संयुगे (व्ही ओ सी ) volatile organic compounds ही पिठात शोषली जातात, यामुळे बेकरी पदार्थ खाणाऱ्या लोकाना कर्करोगाबरोबर यकृत आणि फुफुसाचे आजार वाढण्याचा धोका आहे. Centre for science and enviourment ने नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालात पावाच्या पिठात पोटॅशियम ब्रोमेट कीवा पोटॅशियम आयोडेट या रासायनांचा वापर केला जात असल्याचे नमूद केले आहे.
या रासायनिक घटकामुळे मांवमद्धे कॅन्सर होण्याची आणि थायरॉईडची पातळी बिघडण्याची शक्यता वर्तवली आहे .
Ultra-processed bakery foods मधील Acrylamide:-
२०२५ मधील एका अभ्यासात biscuits, wafers, crackers यांसारख्या processed bakery products मध्ये “acrylamide” नावाचे compound आढळले. काही नमुन्यांमध्ये adolescents साठी carcinogenic risk (कर्करोगाशी संबंधित धोका) वाढू शकतो असे नमूद केले गेले.
बेकरीमध्ये वापरले जाणारे पाम तेल (Palm Oil) जास्त प्रमाणात आणि वारंवार खाल्ल्यास शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतात. विशेषतः अनेक केक, बिस्किटे, पफ, खारी, क्रीम रोल यामध्ये स्वस्त असल्यामुळे पाम तेल वापरले जाते.
पाम तेलामुळे शरीराला होणारे नुकसान:
- पाम तेलात Saturated Fat जास्त असते. त्यामुळे वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) वाढून हृदयविकाराचा धोका वाढतो.
- रोज बेकरी पदार्थ खाल्ल्यास रक्तवाहिन्यांमध्ये चरबी साचू शकते.
- हार्ट अटॅक आणि ब्लॉकेजचा धोका वाढतो.
- पाम तेलात कॅलरी जास्त असतात. वजन वाढणे, पोट सुटणे यास कारणीभूत ठरते.
- जास्त तेलकट आणि प्रोसेस्ड पदार्थामुळे शरीरातील इन्सुलिनचे काम बिघडू शकते.
- वारंवार गरम केलेले पाम तेल शरीरात विषारी घटक तयार करू शकते. त्यामुळे फॅटी लिव्हरचा धोका वाढतो.
- अॅसिडिटी, गॅस, अपचन यासारख्या समस्या होऊ शकतात.
- आपल्या आतड्यात चांगले बॅक्टेरिया असतात जे पचन आणि रोगप्रतिकारक शक्तीस मदत करतात.
- प्रोसेस्ड बेकरी पदार्थ हे बॅक्टेरियांचे संतुलन बिघडवतात.
- बेकरी पदार्थांमध्ये फायबर कमी असते. त्यामुळे पोट व्यवस्थित होत नाही.
- वारंवार तेलकट आणि प्रोसेस्ड पदार्थ खाल्ल्यास आतड्यांत सूज येऊ शकते. काही लोकांना पोटदुखी आणि जुलाबही होतात.
- खूप जास्त प्रोसेस्ड आणि जळलेले बेकरी पदार्थ दीर्घकाळ खाल्ल्यास मोठ्या आतड्याच्या आजारांचा धोका वाढू शकतो.
- सतत जंक आणि बेकरी पदार्थ खाल्ल्यास आतड्यांची भिंत कमकुवत होऊ शकते. त्यामुळे शरीरात दाह (Inflammation) वाढू शकतो.

मग पूर्ण बंद करावे का?
संतुलन महत्वाचे, रोज नाही, occasional द्या
- Maida पेक्षा:
-
- नाचणी
- गहू
- millet options
- Homemade cakes
- गूळ घालून snacks तयार करणे
- Fruit-based desserts
- रिफाईनड तेल ऐवजी तुपाचे प्रमाण जास्त वापरणे.
- आयुर्वेदानुसार आणि आधुनिक आहारशास्त्रानुसार, आपण जे अन्न खातो त्याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर, मनावर आणि ऊर्जा पातळीवर होतो. त्यामुळे “ताजे अन्न” आणि “प्रक्रिया केलेले अन्न (processed food)” यामधील फरक समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे.
ताजे अन्न म्हणजे काय?
- ताजे अन्न म्हणजे असे अन्न जे नैसर्गिक स्वरूपात, कमी वेळात तयार करून खाल्ले जाते. यामध्ये फळे, ताज्या भाज्या, घरगुती शिजवलेले अन्न, डाळी, धान्य इत्यादींचा समावेश होतो. अशा अन्नामध्ये पोषणमूल्य, नैसर्गिक चव आणि आवश्यक सूक्ष्म घटक (nutrients) अधिक प्रमाणात टिकून असतात.
- आयुर्वेदात अशा अन्नाला “सात्त्विक आहार” असेही मानले जाते, कारण ते शरीराला हलके, मनाला शांत आणि ऊर्जा वाढवणारे असते.
प्रक्रिया केलेले अन्न (Processed Food) म्हणजे काय?
- प्रक्रिया केलेले अन्न म्हणजे असे अन्न जे दीर्घकाळ टिकावे म्हणून त्यावर विविध प्रक्रिया केल्या जातात. उदाहरणार्थ, ब्रेड, बिस्किटे, पॅकेज्ड स्नॅक्स, इन्स्टंट फूड्स इत्यादी.
- या अन्नामध्ये preservatives, artificial flavors, रंगद्रव्ये आणि इतर chemical additives वापरले जातात, जे अन्न खराब होऊ नये म्हणून मदत करतात. परंतु या प्रक्रियेमुळे अन्नाचे नैसर्गिक स्वरूप बदलते.
ताजे अन्न आणि processed food मधील मुख्य फरक
ताजे अन्न नैसर्गिक असते आणि त्यामध्ये पोषणमूल्य जास्त प्रमाणात टिकून असते. याउलट प्रक्रिया केलेले अन्न जास्त काळ टिकण्यासाठी बनवले जाते, त्यामुळे त्यातील काही नैसर्गिक घटक कमी होऊ शकतात.
ताजे अन्न शरीराला सहज पचते आणि दीर्घकाळ ऊर्जा देते, तर जास्त प्रक्रिया केलेले अन्न काही लोकांमध्ये पचनाच्या समस्या, थकवा किंवा अस्वस्थता निर्माण करू शकते.
आयुर्वेदिक दृष्टिकोन
आयुर्वेदात अन्नाला फक्त “कॅलरी” म्हणून पाहिले जात नाही, तर त्याला “प्राण” किंवा जीवनशक्तीचा स्रोत मानले जाते. ताजे, नैसर्गिक आणि योग्य प्रकारे तयार केलेले अन्न शरीरात संतुलन राखण्यास मदत करते.
त्याउलट, जास्त प्रक्रिया केलेले अन्न नियमित सेवन केल्यास शरीरातील दोष (वात, पित्त, कफ) असंतुलित होऊ शकतात आणि दीर्घकाळात आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरू शकते.
Bakery पदार्थांसाठी काही पौष्टीक पर्याय
नाचणी-जेगरी कुकीज (Ragi Jaggery Cookies)

साहित्य
-
- १ कप नाचणी पीठ
- ½ कप गव्हाचे पीठ
- ¼ कप गूळ पावडर
- ¼ कप तूप
- वेलची पूड
- ड्रायफ्रूट तुकडे
- थोडे दूध
कृती
-
- सर्व कोरडे साहित्य एकत्र करा.
- त्यात तूप घाला.
- आवश्यक असल्यास थोडे दूध घालून पीठ मळा.
- कुकीजचा आकार द्या.
- 170°C वर 12–15 मिनिटे बेक करा.
प्रोटीन एनर्जी लाडू / बाईट्स:-

साहित्य
- खजूर
- शेंगदाणे / बदाम
- ओट्स
- भोपळ्याच्या बिया
- कोको पावडर
- थोडे मध
कृती
-
- सर्व साहित्य मिक्सरमध्ये फिरवा.
- लाडू किंवा छोटे बॉल तयार करा.
- फ्रिजमध्ये ठेवा.
फायदे
-
- ऊर्जा वाढवते
- मुलांसाठी चांगले
- जिम करणाऱ्यांसाठी उपयुक्त
आयुर्वेदिक टी केक:-

साहित्य
-
- गव्हाचे पीठ
- गूळ
- बडीशेप
- दालचिनी
- वेलची
- सुंठ पूड
- तूप
कृती
-
- सर्व साहित्य मिसळा.
- केक बॅटर तयार करा.
- ओव्हनमध्ये बेक करा.
फायदे
-
- पचनास मदत
- चहासोबत हेल्दी पर्याय
- सुगंधी आणि चविष्ट
सीड क्रॅकर्स:

साहित्य
-
- जवस
- तीळ
- भोपळ्याच्या बिया
- मसाले
- थोडे पीठ
फायदे
-
- फायबर जास्त
- हेल्दी स्नॅक
- वजन नियंत्रणासाठी उपयोगी
निष्कर्ष
आरोग्यदायी जीवनासाठी शक्यतो ताजे, घरगुती आणि कमी प्रक्रिया केलेले अन्न आहारात समाविष्ट करणे अधिक उपयुक्त आहे. यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळते आणि नैसर्गिक ऊर्जा टिकून राहते.
लहान बदल जसे की घरचे जेवण, ताज्या भाज्या आणि फळे यांचा समावेश केल्यास दीर्घकाळात आरोग्यावर मोठा सकारात्मक परिणाम दिसून येतो
मुलाणा सात्विक आणि healthy खाऊ घालायचे असल्यास थोडा वेळ काढून खालील पदार्थ आपण बेकरी ऐवजी मुलाणा करून द्यावी याने त्यांना बेकरी पदार्थ सोडण्यास देखील मदत होईल.
जिभेची सवय बदलायला काही दिवस लागतात… पण पचन बिघडायला कधी कधी काही आठवडेच पुरतात.”
|| Healthy खा व Healthy रहा ||
Written By…
|
Dr. Pallavi Shinde is the director at Shree Vishwamukta Yog, Ayurved and Panchakarma Clinic at Pune, India. She always uses ayurvedic proprietary formulations for many chronic health diseases & many products for Skin Diseases & beauty products. She is a hardcore Researcher, Practitioner, Promoter of Ayurveda. Contact today to book an appointment. |




