Table of Contents

आपल्या मुलांना सुवर्णप्राशन देताय ? मग या गोष्टीची काळजी नक्की घ्या

  • तुमचे मूल अतिशय चंचल किवा अतिशय शांत आहे का?
  • जेवणाकडे अजिबात लक्ष नाही किवा जेवण मागे घेऊन पळावे लागते का?
  • एखादे अक्षर बोबडे बोलणे किवा पूर्णत: बोबडे बोलते का?
  • अभ्यासाकडे अतिशय दुर्लक्ष किवा लक्षात राहत नाही असे आहे का?
  • सतत आजारी असते का? म्हणजे सर्दी,खोकला, ताप वगेरे..
  • ऊंची आणि वजन योग्य प्रमाणात वाढत नाही?

वरीलपैकी कोणतेही उत्तर हो असेल तर आयुर्वेदातील सुवर्णप्राशन तुम्ही नक्की करा.

काय आहे सुवर्णप्राशन ?

भावी पिढी हुशार, कर्तुत्ववान व सर्वगुणसंपन्न होण्यासाठी आयुर्वेदामद्धे मुलांच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक पातळी वाढीसाठी विविध संस्कार वर्णन केले आहेत. या १६ संस्कारापैकी सुवर्णप्राशन हा लहान मुलांकरिता केला जाणारा महत्वाचा संस्कार होय.

आयुर्वेद एक प्राचीन भारतीय चिकित्सा पद्धती आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, व याच संस्कृतीला आयुर्वेद शास्त्राची जोड आहे.

बाळ जन्माला आल्यावर देखील सोन्याच्या काडीने मधाच्या सहाय्याने बाळाच्या जिभेवर आपण ओम लिहितो. जेणेकरून बाळाची बुद्धी आणि वाचा तल्लख होण्यास मदत होते. आजकाल या सर्व पद्धती लोप पावत असल्याने काळानुसार बाळाच्या आरोग्याच्या रक्षणासाठी औषधीयुक्त तूप + मध + शुद्ध सोन्याचे भस्म या मिश्रणाचे चाटण बालकांना पुष्य नक्षत्र दिवशी मंत्रानी सिद्ध करून दिले जाते. यालाच “लेहन” असे म्हणतात. लेहन याचा शाब्दिक अर्थ “चाटणे” असा होय.

औषधीयुक्त तूप म्हणजे नेमके काय ?

ज्याप्रमाणे आपण दुधापासून तूप बनविण्याची प्रक्रिया करतो एकेमागून एक त्यावर एक एक संस्कार करून तूप सिद्ध होते, त्याचप्रमाणे गाईचे तूप घेउन त्यामध्ये आयुर्वेदातील काही वनस्पति जसे की, शतावरी, ब्राम्ही, वेखंड, जेष्टमध, कोष्ट व इतर काही वनस्पति वापरुन त्याने अग्नियुक्त संस्कार देऊन सिद्ध तूप केले जाते.

संस्कारित हे सिद्ध तूप पचनास अगदी हलके तसेच मुलांची ग्रहनशक्ती व आकलनशक्ति वाढविण्यास खूप उपयुक्त ठरतात.

सुवर्णप्राशन कधी द्यावे ?

हिंदू संस्कृतींनुसार दर २७ दिवसानी पुष्य नक्षत्र असते आणि हे अतिशय शुभ मानले गेले आहे.

पुष्य म्हणजे पोषण. वेदिक शास्त्रामध्ये याला नक्षत्रांचा राजा म्हणाले आहे. पुष्य नक्षत्र हे शुभ, शक्ति आणि ऊर्जा देणारे नक्षत्र आहे. या दिवशी कोणतेही कार्य केल्यास उत्तम फलप्राप्ती होते.

 या दिवशी ग्रहणशक्ति ही सर्वाधिक असते म्हणूनच मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी पुष्य नक्षत्र दिवशी हे औषध बनवून मुलांना दिले जाते.

किती वयापर्यंतच्या मुलांना देता येते?

जन्मलेल्या एक वर्षाच्या बाळापासून १२ वर्षापर्यंतच्या मुलांना देता येते.

यामुळे मुलांना काय फायदा होईल?

  • रोगप्रतिकार शक्ति वाढते
  • ऐकण्याची, बोलण्याची क्षमता वाढते
  • बुद्धी, स्मरणशक्ती व आकलनशक्ति वाढते
  • पचनशक्ती सुधारते, भूक वाढते व पोत देखील व्यवस्थित साफ होते
  • ज्या बाळाला आईचे दूध मिळत नाही अथवा कमी प्रमाणात मिळते.
  • त्वचेची कांती सुधारते
  • ऊंची व वजन वाढण्यास मदत होते.
  • दात येताना होणारा त्रास कमी होतो.
  • शब्द स्पष्ट उच्चारले जातात, शब्द ग्रहण क्षमता वाढते
  • हवामान बदलामुळे होणार्‍या आजारापासून बचाव होतो.
  • एकूणच इतर मुलांच्या तुलनेत सुवर्णप्राशन घेतलेली मुले अतिशय तल्लख, सुदृढ आणि प्रभावशाली बनतात.

आयुर्वेदातील वर्णन :

सुवर्णप्राशन ही एतत मेधाग्नी बलवर्धनम |

आयुष्यं मंगलम पुण्यम वृष्यम वर्ण्यम ग्रहापहम ||

मासात परम मेधावी व्याधीभिर्नच धृष्यते |

षडभिरमासै: श्रुतधर सुवर्णप्राशनाद भवेत ||

                              (काश्यप संहिता सूत्रस्थान )

किती दिवस औषध द्यावे ?

वर श्लोकामद्धे उल्लेख केल्याप्रमाणे कमीत कमी सहा महीने सलग औषध द्यावे.

काय काळजी घ्यावी ?

याकरिता वेगळी अशी कोणतीही काळजी पालकांना घ्यावी लागत नाही.

औषध जर अनुभवी वैद्यांकडून घेतले तर कोणतीही काळजी घेण्याची विशेष गरज भासत नाही. कारण औषध बनवतानाच याची विशेष काळजी वैदयाला घ्यावी लागते. म्हणजे सर्व औषधांचे प्रमाण आणि बनवण्याची पद्धत आणि काळ.

यातील सुवर्णभस्म लहान मुलांना पचते का की याचा काही त्रास होतो?

आयुर्वेदात सुवर्णभस्म म्हणजे सोन्याचे भस्म बनविण्याची एक विशेष पद्धत सांगितली आहे. यानुसार हे भस्म बनविल्यास हृद्य व मस्तीष्क यांचे आरोग्य सुधारते.

आकलन शक्ति वाढविते व तसेच शरीरामद्धे नवीन पेशींची निर्मिती करण्यास उपयुक्त ठरत आहे.

पचन व्यवस्थित होण्यासाठीच सुवर्णप्राशन या औषधांमधील सुवर्ण भस्माची मात्र ही अत्यंत कमी प्रमाणात वापरली जाते व इतर औषधीयुक्त तुपासह हे मिश्रण बनविले जाते.

आईचे दूध पित असलेल्या बाळाला सुवर्णप्राशन केले तर चालते का?

नुकत्याच जन्मलेल्या बाळापासून ते वयाच्या १२ वर्षापर्यंत आपण ही सुवर्णप्रशन सर्व बालकाना देऊ शकतो. फक्त आईच्या दुधावर असणाऱ्या बालकाला तर सुवर्णप्रशन मधील घटकद्रव्ये एक प्रकारचे पोषण च करते. 

Premature जन्मलेल्या बाळाला सुवर्णप्राशन संस्काराने उपयोग होतो का?

Premature बाळामद्धे सुवर्णप्राशन संस्काराने वजन व ऊंची वाढण्यास अतिशय फायदा दिसून येतो. यातील द्रव्ये बाळाची शारीरिक आणि मानसिक अशी दोन्ही वाढ करताना दिसून येतात.

बाळाला जन्मल्या पासून एखादी शारीरिक / मानसिक व्याधी असल्यास सुवर्णप्राशन करत येते का?

अगदी, कारण सुवर्णप्राशन बनविलेल्या औषधा मध्ये ज्या वनस्पति तूप बनविण्यासाठी वापरल्या जातात त्या बौद्धिक आणि शारीरिक वाढीसाठी अत्यंत उपयुक्त आहेत.

अतिस्थूल (Obesity) असलेल्या मुलांनी सुवर्णप्राशन करावे का?

यातील घटक द्रव्ये पाचक असल्याकारणाने शरीरामद्धे गेल्यावर पंचनांचे काम अत्यंत सुलभरीत्या करते.

टीप : फक्त यावेळी औषधाचा डोस किती घ्यावा ही मात्र वैद्यांच्या सल्ल्याने ठरवावे.

बाळाला अथवा मुलाना सुवर्णप्राशन सुरू केल्यापासून प्रकृतीमध्ये किती अवधीत फरक पडायला सुरुवात होते?

सलग 3 महीने औषध पोटात गेल्यानंतर लगेचच याचे परिणाम शरीरावर दिसून येतात.

मुलाना सुवर्ण प्राशन सुरू केल्यावर कोणती निरीक्षणे करावीत?

भूक सुधारते.

पोट व्यवस्थित साफ होते.

अतिचंचल मुलांची चंचलता कमी होताना दिसते

ग्रहणशक्ती वाढते.

Fastfood (उदा. Noodles, Pasta, Biscuits, Cold Drinks ) खाणाऱ्या मुलाना सुवर्णप्राशन संस्काराने उपयोग होतो का?

नक्कीच, कारण सुवर्णप्राशन औषधाने  पचन सुरू होऊन मुलाना चांगली भूक लागते व ते Noodles ,Pasta अश्या गोष्टींचा आग्रह न धरता मुले आईच्या सांगण्याप्रमाणे वागतात.

एकदा सुवर्णप्राशन सुरू केल्यावर पुढील सर्व दिवस पाळणे अनिवार्य आहे का?

हो, एकदा सुवर्णप्राशन देऊन फरक पडत नाही कारण यातील औषधाचे प्रमाण ही अगदी सुवर्ण भस्मा मुळे अगदी कमी प्रमाणात दिले जाते. याच करिता नियमितपणे ६ महीने तरी सुवर्णप्राशन दिले गेले पाहिजे. हे  पुढे १-२ वर्षं नियमित ठेवल्यास अतिशय उत्कृष्ट परिणाम दिसून येतात.

एकदा सुवर्णप्रशन सुरू केल्यावर यामध्ये खंड पडला तर काही अपाय होतो का?

खंड पडल्यास काही अपाय होत नाहीत, फक्त अपेक्षित परिणाम दिसून येत नाहीत.

सुवर्णभस्म चवीला कडू/तिखट असते का? असल्यास मुलाना ते घेण्यास कसे तयार करावे?

सुवर्णभस्म हे औषधीयुक्त तूप व मधासह दिल्यास सुवर्णभस्मची चव लागत नाही. तसेच मधामुळे औषध अगदी गोड असते आणि लहान मुलाना असेही मध आवडतो औषध गोड आहे असे सांगितल्यास ते आवडीने औषध घेतात.

सुवर्णप्राशन संस्काराचे काही side effects आहेत का?

यामध्ये अतिशय काळजीपूर्वक शुद्ध सुवर्णभस्म, गाईचे औषधीयुक्त तूप आणि मध असल्याने कोणत्याही साइड एफेक्ट शिवाय हे औषध घेता येते.

सुवर्णप्राशन संस्कार केल्यावरही बाळाच्या अथवा मुलाच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही हे शक्य आहे का? तसे झाल्यास त्याची करणे काय असू शकतात ?

असे होऊ शकते, कारण बालकाना इतर काही आजार असल्यास सुवर्णप्राशन या औषधासोबत इतरही औषधे योजवी लागतात. याकरिता आपल्या बालकाना वैद्यांच्या देखरेखीखालीच औषधे देणे गरजेचे आहे

मुलगा व मुलगी ह्यांच्या सुवर्णप्राशन संस्कारात फरक असतो का?

नाही, औषधमद्धे इतर काही आजार असेल तर अथवा वयानुसार फक्त डोस मध्ये बदल होऊ शकतो मुलगा किंवा मुलगी यानुसार हा बदल आढळून येत नाही.

बाळाला काही इतर व्याधींसाठी औषधउपचार चालू असल्यास “सुवर्णप्राशन” करता येते का?

नक्कीच, याचा इतर औषधांसाह वापर केल्यास कोणताही अपाय होत नाही.

परदेशात राहण्याऱ्या मुलांना जेथे आयुर्वेदिक उपचार अथवा वैद्य उपलब्ध नाहीत त्यांच्यासाठी सुवर्णप्राशनाऐवजी काही दुसरा पर्याय आहे का?

याकरिता पर्यायी असे औषध नाही, परंतु सुवर्णप्राशन ही औषध आपण परदेशातही मिळवू शकता.

संपूर्ण “सुवर्णप्राशन संस्कार” ह्या उपचार पद्धतीचा साधारण खर्च किती असतो?

महिन्याच्या औषधाचे साधारण रु. २००-५०० रुपये इतका खर्च येऊ शकतो. प्रत्येक वैद्यच्या औषध पद्धतीवर हा अवलंबून असतो. 

ह्या वर्षी कोणत्या दिवशी सुवर्णप्राशन आहे?

१४ सप्टेंबर २०२०

१४ ऑक्टोबर २०२०

०७ नोवेंम्बर २०२०

४ व ५ डिसेंबर २०२०

आजच आपल्या मुलांना सुवर्णप्राशन करा व त्यांची रोगप्रतिकार शक्ति वाढवा.

Written By…

Dr. Pallavi Shinde is the director at Shree Vishwamukta Yog, Ayurved and Panchakarma Clinic at Pune, India. She always uses ayurvedic proprietary formulations for many chronic health diseases & many products for Skin Diseases & beauty products. She is a hardcore Researcher, Practitioner, Promoter of Ayurveda. 

Contact today to book an appointment.

सुवर्णप्राशन संस्कार – मुलांना सदृढ, निरोगी व तेजस्वी बनविण्याचा आयुर्वेदिक उपाय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *