शतावरी म्हणजे काय ?

शतावरी वेल किवा झाडाच्या रूपात असणारी एक आयुर्वेदिक वनस्पती  आहे. याचा वेल झाडीदार आणि पसरणारा असतो. झाडाची मुळे जाड, लांबट गोल असून दोन्ही टोकाकडे निमुळती असतात यांनाच कंद असे म्हणतात. कंद हे पांढरे असून एका झाडाला १०० पर्यन्त असू शकतात. यामुळेच या वनस्पतीला शतावरी असे म्हणतात.

मुळांच्या वर पातळ करड्या रंगाचा पापुद्रा असतो, तसेच मूळाचा मधला भाग पिवळसर रंगाचा आणि टणक असतो.

मुळांचा औषधात वापर करताना हा भाग काढून टाकावा लागतो.

जगभरात शतावरी खालील नावाने प्रसिद्ध आहे :

  • संस्कृत– शतावरी आयुर्वेद – नारायणी, शतपदी, शतमुली , महाशिता,अतिरसा, भीरु, कांचनकारिणी, पिवरी, सूक्ष्मपत्रिका, बहुसुता, बृहत्रया, तालमुली.
  • हिन्दी- शतावर, सतावर, सतावरी, सातमुली, शतावरी, सरनोई.
  • मराठी – शतावरी,अश्वेल
  • गुजराती – सेमुखा, एकलकांता
  • बंगाली – शतमुली
  • ओरिसा – मोहनेले, चोत्तालू.
  • तेलगू – एट्टुमट्टी टेंडा
  • पंजाबी – बोजिदान,बोजान्दन
  • तामिळ – सडावरी, किलवारी, पाणियीनाक्कू.
  • कन्नड – माज्जिगे गडडे
  • फारसी – शकाकुल
  • नेपाळ –सतामुली, कुरीलो
  • इंग्लिश – एरेस मोसस
  • लॅटिन – अॅस्परागस रेसेमोसस

शतावरी श्लोक

शतावरी बहुसुता भीरुरुंदीवरि वरी |

नारायणी शतावरी शतवीर्य च पिवरी ||

महाशतावरी चान्या शतमूल्यर्धकंटिका |

सहस्त्रवीर्यहेतूश्चं ऋष्यप्रोक्ता महोदरी ||

शतावरी गुरु शीता तिक्ता स्वाद्वि रसायनि |

मेधाग्नी पुष्टिदा स्निग्धा नेत्र्यगुल्मातीसारजित ||

शुक्रस्तन्यकरी बल्या वात पित्तास्त्र शोथजित |

महाशतावरी मेध्या हृदया वृष्या रसायनि ||

शतवीर्य नीहन्त्यअर्शोग्रहणीनयनामयान | १६० | (भा.प्र.)

शतावरी गुण कर्म:

रस : मधुर (गोड), तिक्त (कडू)

वीर्य : शीत

विपाक : मधुर (गोड)

गुण : गुरु, स्निग्ध

शतवारी ही वात पित्त कमी करते.

व्याधींनुसार उपयोग :

याचा उपयोग बर्‍याच व्याधीमध्ये शरीराला बल देण्याचे काम करते

  • अनिद्रा : कोणत्याही प्रकारच्या झोपेच्या तक्रारीवर शतावरी खूप उत्तमरीत्या काम करते. 2-4 gm शतावरी चूर्ण कोमट दुध व ½ चमचा गाईचे तूप घालून घेतल्यास शांत झोप लागण्यास मदत होते.
  • ताकद वाढविण्यासाठी व वजन वाढविण्यासाठी : शतावरी तूप संपूर्ण अंगाला लावून मालीश करणे व पोटातून 1-1 चमचा घेणे.
  • सर्दी-खोकला : शतावरी मुळयाचा काढा 15-20 ml घेतल्यास आराम मिळतो.
  • घश्याचे आजार व आवाज सुधारण्यासाठी : बला चूर्ण 1 + शतावरी + जेष्टमध मधासह घेतल्यास आवाज सुधारतो आणि घशाच्या त्रासास आराम पडतो.
  • मूळव्याध व रक्तीआव : दुधासह शतावरी घेतल्यास फायदा होतो.
  • मूत्र विकारात : शतावरी 10-30 मिलि गोखरू च्या काढयसह सरबतसारखे घेतल्यास फायदा होतो.
  • अॅसिडिटी व पेप्टिक अल्सर: 3-5 ग्रॅम शतावरी चूर्ण दूध अथवा गुलकंदसह घेतल्यास पित्त शमन होऊन अल्सर वर आराम मिळण्यास मदत होते॰
  • माइग्रेन : शतावरी बारीक करून नंतर त्यामध्ये तीळ तेलसमप्रमाणात मिक्स करावे आणि ह्या सिद्ध केलेल्या तेलाची डोक्याला मालीश करावी.
  • मानसिक तणाव कमी करण्यास : शतावरी एड्प्टोजेनीक वनस्पति म्हणून काम करून शरीरातील तणाव हार्मोन कमी करते आणि तुमचे मन तणावमुकत ठेवते.
  • स्व-प्रजनन : शतावरीमध्ये फायटो-एस्ट्रोजेन नावाचे हार्मोन असल्याने प्रजनन क्षमता वाढविते, शतावरी चूर्ण गर्भाशयाला बळ देण्याचे काम करते. शतावरी फक्त गर्भाशयालाच नाही तर प्रसूती अवस्थेत दूध वाढविण्यास मदत करते. प्रसूती अवस्थेत दूध वाढविण्यासाठी 5-10 ग्रॅम घेवून यावर कोमट दुध घ्यावे.
  • इम्युनिटी वाढविण्याकरिता : शतावरी मध्ये विटामीन ए भरपूर प्रमाणात आढळते जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप हितकारक आहे.शतावरी मध्ये असलेले पोटेशियम किडनी ला सुधारण्यास मदत करते.
  • ब्लड शुगर : शतावरी अॅंटी इनफ्लामेटरी म्हणून काम करते. शतावरी मध्ये असलेले विटामीन बी ब्लड शुगर कमी करण्यास मदत करते.
  • प्रदर रोग : शतावरी चूर्ण 5 – 10 ग्राम तांदळच्या पाण्यासह घेणे अथवा तुपामध्ये शतावरी मिक्स करून घेवून यावर कोमट दूध पिल्यास प्रदर रोगात आराम मिळतो.
  • पित्त-प्रकोप व अजीर्ण : 5 ग्रॅम चूर्ण मधासोबत सकाळी आणि संध्याकाळी घेणे.
  • शतावरी चूर्ण तुपासह सकाळी संध्याकाळी घेवून वरुण कोमट दूध घेतल्यास शारीरिक थकवा, अनिद्रा, धातुक्षिणता, व मुत्रमार्गातील अवरोध दूर करते.
  • वातप्रकोप अवस्थेत शतावरी व पिंपळी चूर्ण मधासह सकाळी संध्याकाळी घेणे.
  • गर्भवस्थेत : गर्भवती स्त्री करिता शतावरी 2र्‍या,सहाव्या,आणि सातव्या महिन्यामद्धे दुधासह व नवव्या महिन्यात शतावरी सिद्ध तेल एनिमा (बस्ती) घेतल्यास अथवा योनिमार्गामद्धे या तेलाचा पिचु ठेवन्यास आयुर्वेदात संगितले आहे. यामुळे प्रसवपीडा होत नाही तसेच योनिप्रदेश इलास्टिक, पुष्ट आणि स्निग्ध राहतो.
  • संधिवात आणि मेनोपोस: शतावरी हाडे आणि संध्याना बळ देण्याचे काम करते.
  • पुरुषाकरिता : शतावरी स्त्रीया प्रमाणेच पुरुषांमध्येही प्रजनन शक्ति आणि ताकद वाढविण्याचे काम करते. वाजीकरन म्हणून काम करते.
  • पिसिओएस: शतावरीचे शरीरावर ईस्ट्रोजन सारखे काम करते, जे महिलांमधील होर्मोन सुसज्ज करण्यास मदत करतात॰पिसिओएस निवारण्यासाठी त्याची कार्यक्षमता आणि मात्रेची पुष्टी करण्यासाठी अजून संशोधन चालू आहे.
  • केसांच्या आरोग्यासाठी : शतावरी एक नैसर्गिक जिवाणूविरोधी व बुरशीरोधी आहे. ती डोक्याच्या कातडीचे बुरशीजन्य संक्रमण रोखण्यास मदत करते. दाहशामक आणि एंटीऔक्सिडेंट असून ती सुनिश्चित करते की तुम्हाला एक्झेमा आणि सोरीयसिस डोक्याच्या कातडीच्या समस्या होत नाहीत. यामुळे केसगळती आणि वेळेपूर्वी केस पांढरे होणे ही कमी होते.
  • कर्करोगात : संशोधन दर्शविते की शतावरी मूळ व पानांच्या सारामद्धे कर्करोग रोधी शक्ति आहे. असे आढळून आले आहे की या रोपमध्ये उपस्थित असलेल्या सक्रिय योगिक शतावरीन, कर्करोग कोशिकांची वाढ आणि प्रसार दाबून ठेवते.

अनुपान : दूध, पाणी, मध, तूप इ.

आयुर्वेदिक आचार्यानुसार वर्णन :

वागभट आचार्य : विदारीगंधादी वर्गात उल्लेख

चरक आचार्य : बल्य, वयस्थापन, मधुर स्कंद वर्ग

सुश्रुत आचार्य : विदारीगंधादी, पित्तशामक, कंटक पंचमुळ

बाजारामद्धे शतावरी पाऊडर आणि शतावरी कल्प असे दोन प्रकार तुम्हाला मिळतील आणि वरील कोणत्याही तक्रारीकरिता शतावरी घेण्यापूर्वी आपल्या जवळच्या वैद्यांचा सल्ला नक्की घ्या.

Written By…

Dr. Pallavi Shinde is the director at Shree Vishwamukta Yog, Ayurved and Panchakarma Clinic at Pune, India. She always uses ayurvedic proprietary formulations for many chronic health diseases & many products for Skin Diseases & beauty products. She is a hardcore Researcher, Practitioner, Promoter of Ayurveda. 

Contact today to book an appointment.

बहुपयोगी शतावरीस माझे शतशः नमन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *